Header Ads Widget

नरसिंह शिवछत्रतींचा प्रताप , अफजल खानाच्या वधाचा वज्रनिर्धार

 नरसिंह शिवछत्रतींचा प्रताप , अफजल खानाच्या वधाचा वज्रनिर्धार

अद्वितिय शिवप्रताप :

प्रतापगडचे युद्ध जागतिक पातळीवरील महत्त्वाचे युद्ध मानले जाते. जगातिल सर्व देशांमधील सैनिकी विद्यापीठांमध्ये गनिमी काव्याची आदर्श लढाई ( Model Guerilla War ) नकाशासह शिकवली जाते. इंग्लंडची राजधानी लंडन आणि पोर्तुगालची राजधानी लिस्बन या दोन ठिकाणी १६५९ साली वर्तमान पत्रातून अफझलखान वधाची घटना छापून आली आहे. 

Sketch : Dnyandeo Shingate

अफझलखान वधाच्या घटनेनंतर उत्साही आणि आनंदी बनलेला आसामचा राजा लाचित बडफुकन याने औरंगजेबाला पत्र लिहून “ आसाममध्ये दुसरा शिवाजी तुझी वाट पाहत आहे " असे आव्हान दिले होते. इराणचा बादशहा शहाअब्बास याने औरंगजेबाला पत्र लिहून त्याची निर्भत्सणा केली. अश्या प्रकारे प्रतापगडाच्या विजयाचे पडसाद जगात अनेक ठिकाणी उमटले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अफझलखानाच्या सैन्याची संख्या पंचविस हजार होती. शिवाजी महाराजांकडे फक्त पाच हजार सैन्य होते परंतु शिवाजी महाराजांची युद्धनिति ( लढाईचे डावपेच ) ऐवढी प्रभावी होती की एेवढ्या कमी सैन्यबळाच्या सहाय्यानी त्यांनी अफझलखानाचा संपुर्ण पाडाव केला. विजापुरला दोनच गोष्टी पोहोचल्या अफझलखान मेल्याची बातमी आणि लंगडा फाझलखान. या युद्धानंतर महाराजांनी कोणताही आनंदोत्सव साजरा केला नाही, पुढच्या महिन्याभरात पन्हाळगडापर्यंत मजल मारली. पन्हाळा, चंदन-वंदन यांच्यासारख्या अनेक किल्ल्यांवर त्यांनी भगवे निशाण फडकवले आणि आदिलशाही मुलुख पादाक्रांत केला. स्वराज्याच्या सीमा वाढवल्या. एकंदरीत अफझलखान वधामुळे निर्माण झालेला उत्साह महाराजांनी स्वराज्य विस्तारासाठी वापरला. महाराज यशाने हुरळुन गेले नाहित आणि मायभुमिच्या स्वातंत्र्यासाठी आवश्यक असलेली मोहिम त्यांनी थांबवली नाही. ते खरे कर्मयोगी होते ! महाराजांनी येवढे मोठे यश वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी संपादन केले हे विषेश. 

अफझलखान वधाच्या अद्भुत घटनेनंतर जनतेच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेली भक्ती मोठ्याप्रमाणात वाढली. त्यामुळे समर्थांसारखा विरक्त योगीसुद्धा म्हणाले,  

शिवरायांचा आठवावा प्रताप

नरसिंह शिवछत्रपती :

१६५७ मध्ये मोगलांचा दख्खनचा सुभेदार म्हणुन औरंगजेब विजापुरकरांशी लढत होता. त्यावेळी बिदर आणि कल्याणी हे दोन किल्ले जिंकले होते. विजापुरकरांच्या आजुबाजुच्या मुलखात औरंगजेब खुप धुमाकुळ घालत होता. त्यावेळेस खान महंमद या सरसेनापतीच्या हाताखाली मोठी फौज औरंगजेबाला रोखण्यासाठी विजापुरहुन निघाली, या फौजेत अफझलखान आघाडीवर होता. औरंगजेबाच्या फौजेला आदिलशहाच्या फौजेनी घेरले आणि अडचणीच्या प्रदेशात कोंडले, अफझलखानाने शौर्याची कमाल केली आता औरंगजेबाला पराभव स्पष्ट दिसु लागला. त्याची कत्तल तरी होणार किंवा कैद तरी होणार हे निश्चित झाले होते, त्यावेळेस औरंगजेबाने सरसेनापती खान महंमद याच्याकडे अत्यंत दिनवान्या शब्दात पत्र लिहून जिवदान मागितले होते. खान महंमदाने औरंगजेबास दुसर्या दिवशी पहाटे पळून जाण्यास मदत केली. हि गोष्ट अफझलखानाला उशिरा कळली परंतु संतापलेल्या अफझलखानाने त्यानंतर विजापुरमध्ये जाऊन बादशहाकडे तक्रार मांडली. चौकशीच्या निमित्ताने खान महंमदाला विजापुरला बोलवण्यात आले. दरबारात येत असताना दरवाजातच त्याचा मुडदा पाडण्यात आला. या कथेचे तात्पर्य पुढे दिल्लीचा बादशहा झालेला औरंगजेब एकेकाळी अफझलखानाकडून पराभूत झाला होता. म्हणुन तो नेहमी अफझलखानाबद्दल वचकुन असे. आणि ज्याला औरंगजेब घाबरत होता अश्या पराक्रमी अफझलखानाला शिवछत्रपतींनी फाडून टाकले म्हणुन ते नरसिंह ठरले. औरंगजेब आणि अफझलखान यांच्यापेक्षा पराक्रमामध्ये शिवाजी महाराज श्रेष्ठ होते ही गोष्ट आम्हा हिंदूंना निश्चितच प्रेरणा देणारी आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वर्तमान काळात पराक्रम गाजवण्याचे प्रत्येक हिंदू युवकाचे ध्येय्य असावे. त्या पराक्रमाला कोणत्याही क्षेत्राची कमतरता नाही. राजकारण असो, समाजकारण असो, अर्थकारण असो हिंदू युवकांनी शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून पराक्रम गाजवला पाहिजे आपले श्रेष्ठत्व सिद्ध केलं पाहिजे, तिच खरी भारत मातेची पुजा.

शिवरायांचे चातुर्य :

        महाराजांचे वकिल गोपिनाथपंत बोकिल अफझलखानाच्या भेटीसाठी वाईला प्रतापगडावरून अनेकवेळा ये जा करत होते. त्यांनी आणि महाराजांच्या हेरांनी एक मौल्यवान माहीती दिली, खानाच्या छावणीत हिर्या-मोत्यांचे व्यापारीसुद्धा मालासह विजापुरहुन आलेले आहेत. महाराजांच्या डोक्यात एक वेगळीच योजना त्यामुळे तयार झाली. त्यांनी पंताजी काकांना निरोप दिला की खानाला सांगा “ आपला आणि आपल्या बरोबर आलेले शुर सरदारांचा मानमरातब करण्याची राजांची इच्छा आहे, त्यासाठी आपल्या बरोबर आलेले जे सराफी व्यापारी आहेत त्यांना गडावर पाठवुन देणे. राजे त्यांच्याकडील हिरे-मोती खरेदी करू इच्छितात.” खानाला ही गोष्ट फार आवडली त्याने सर्व व्यापार्यांना हुकुम दिला की तुमचा सर्व माल घेऊन प्रतापगडावर शिवाजी राजाकडे जा शिवाजी तुमचा माल खरेदी करील. हे ऐकुण व्यापारी अत्यंत खुष झाले कारण त्यांचा माल आता एकदम खपणार होता. खान ही खुष झाला, शिवाजी आपल्याला भ्यालेला आहे याची त्याला खात्री पटली, शिवाजी आपली बडदास्त ठेवतोय या भावनेनी तो अत्यंत खुष झाला. अर्थात शत्रुला बेसावध ठेवण्याची महाराजांची ही निती होती. हिर्या-मोत्यांनी गच्च भरलेल्या पेट्या घेऊन व्यापारी गडावर आले. महाराजांनी सर्व माल ताब्यात घेतला आणि व्यापारांचाही आदर सत्कार करून गडावर ठेऊन घेतले. मालाची किंमत खानसाहेबांच्या भेटीनंतर द्यायचे असे ठरले. विजापुरचे हुशार व्यापारी शिवाजी महाराजांपुढे भोळसट ठरले. खानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांनी सर्व व्यापार्यांना सुनावले आम्ही ताब्यात घेतलेल्या मालाची किंमत तुम्ही आदिलशहा कडून वसुल करा. त्यांच्या सैन्याने आमच्या मुलखाचे खुप नुकसान केले आहे त्या नुकसानाची भरपाई म्हणुन सर्व माल आम्ही ठेऊन घेतला असे तुम्ही आदिलशहाला सांगा. व्यापारी अक्षरश: हादरून गेले परंतु जीव वाचल्याचे समाधान मानीत त्यांनी गड सोडला. महाराजांच्या चातुर्यामुळे स्वराज्याच्या खजिन्यात मोठी भर पडली.

महाराजांच्या राजकारणाला अर्थकारणाचा भक्कम आधार होता आणि महाराज त्यासाठी अत्यंत सावध होते, संधीचे सोने करणे हा त्यांच्या कामाचा स्थायीभाव होता.

अफझलखान वधाचा वज्रनिर्धार :

       अफझलखानाने भवानी मातेची मुर्ती फोडली त्यामुळे प्रत्येक स्वाभिमानी मावळा संतप्त झाला होता, महाराज तर कमालीचे चिडले होते. परंतु महाराजांना सल्ला देणारे जे जाणकार लोकांचे मंडळ होते त्याच्यामध्ये स्वत: जिजामाता होत्या, गोमाजी नाईक पानसंबळ, कृष्णाजी नाईक, मोरोपंत, निळोपंत, आण्णाजीपंत, सोनोपंत, गंगाजी आणि मंगाजी, नेताजी पालकर, रघुनाथपंत अत्रे, प्रभाकरभट राजोपाध्ये वैगेरे जीवाभावाची मंडळी होती. आता पर्यंत खानानी केलेली कृत्ये भयंकर होती, त्याने शहाजी राजांना साखळदंडाने बांधुन त्यांची वीजापुरात धींड काढली होती. शिवाजी महाराजांचे थोरले बंधु संभाजी राजे यांचा मृत्यु त्याच्याच दगाबाजीमुळे झाला होता. आतातर त्याने महाराष्ट्राची कुलस्वामीनी फोडली होती. काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील शिरेपट्टन येथील कस्तुरीरंग नावाचा राजा लढाईमध्ये अफझलखानाला भारी पडला होता, अफझलखानाने गोडबोलुन त्याला तहाला बोलवले आणि वाटाघाटीच्या वेळेला दगा करून मारून टाकले. या सर्व पार्श्वभुमीमुळे सर्वांनी महाराजांना स्पष्ट सांगितले लढाई नकोच तह करावा. परंतु महाराज म्हणाले “ खानाशी सला केलीयाने प्राणनाश होईल, युद्ध केलियाने जय झालियास उत्तम, प्राण गेलीयाने कीर्ती होईल “ त्याकरता खानाशी युद्ध करावे. शिवाजी महाराजांचा हा जहाल विचार या मंडळींना मानवला नव्हता परंतु महाराज आपल्या विचारावर ठाम होते. आपल्या विश्वासातील चार-दोन मंडळींना बोलताना ते म्हणाले “ रामाने रावणाला मारले, कृष्णाने कंसाला ठार केले त्याचप्रमाणे मी खानाला ठार मारणारच.” या असुरी दृष्टाचा मीच नाश करील. महाराज चिंता करत नव्हते परंतु विचार मात्र निश्चित करत होते. असे असताना एेके दिवशी रात्री महाराजांना स्वप्न पडले, स्वप्नामध्ये साक्षात आई जगदंबा त्यांच्या समोर उभी राहीली.

 महाराज नम्रतेने आईच्या चरणावर लीन झाले. जगदंबेने त्यांना उठवले आणि आशिर्वाद दिला की चिंता करू नकोस तुजला यश मिळेल मी तुझी तलवार होऊन राहीली आहे. असे बोलुन ती महान तेजस्वी मुर्ती महाराजांच्या भवानी तलवारीत शिरून अदृष्य झाली. कोटी सुर्याचे दिप्तीमान तेज तलवारीत प्रेवेशुन विलीन झाले. त्यावेळेला महाराजांनी डोळे उघडून पाहिले तेव्हा त्यांना जाणीव झाली की आपल्याला स्वप्न पडले स्वप्नात जगदंबेने आशिर्वाद दिला. महाराजांनी आऊसाहेब, नेताजी, मोरोपंत, निळोपंत, रघुनाथपंत, गोमाजी नाईक, प्रभाकरभट इ. मंडळींना जवळ बोलवुन आपले दिव्य स्वप्न त्यांना कथन केले ते म्हणाले “ आई प्रसन्न जाहली आता अफझलखानास मारून गर्दीस मिळवितो.” त्यामुळे सर्व मंडळी प्रसन्न झाली.

Post a Comment

0 Comments