माणूस जोडण्याची कला ?
माणूस जोडण्याची कला ? चला कला आणि यशस्वी म्हणजे काय ? समजून घेऊ या
The art of connecting people? Let's see what is art and success? Let's understand
"जो वर्षाचा विचार करतो,
तो धान्य पेरतो...
जो १० वर्षांचा विचार करतो,
तो झाडे लावतो...
जो आयुष्यभराचा विचार करतो,
तो माणुस जोडतो
आणि
जो माणुस जोडतो....
तोच आयुष्यात यशस्वी होत असतो."
जगात लोक यशस्वी होतात, पण ते वेगवेगळ्या क्षेत्रात, त्यांच्या यशाची कल्पना, संकल्पना वेगवेगळी असते. आता पहा झरे यशस्वी एकंदर लोकसंख्येच्या किती टक्के असतात, अगदीच नगण्य. आता यशस्वी कशाला म्हणावे? दोन उदाहरणे पाहू यात.
उदाहरण १-
एकजण साधा कामगार असतो, पण त्यातल्या त्यात पैसे वाचवून मुलांना चांगले शिक्षण देतो, मुलांना चांगली नोकरी, मिळते, त्यांची चांगल्या घरात लग्ने होतात, आणि मुले आईबापांना कधीही अंतर न देता सुखात ठेवतात. पण दुसरा भरपूर कमावतो आहे, गाड्या घोडे आहेत, भरपूर पैसा आहे, पण मुलांना व्यसने आहेत याला काहीतरी शाररीक समस्या आहेत, तसा हा सुखी आहे पैशाची चिंता नाही, म्हातारपणी कष्ट करण्याची गरज नाही. मग हा सुखी का? तर सुखाची व्याख्या व्यक्तिनुरूप बदलते.
उदाहरण २ -
एकाला शास्त्रज्ञ व्हायचे असते, पण आईवडिलांच्या हट्टाखातर त्याला वकिली करावी लागते तर आता तो आयुष्यभर पैसा मिळवूनही समाधानी असेल काय? त्याची शास्त्रज्ञ होण्याची खंत त्याला टोचतच राहील ना?
आपले आयुष्य जेमतेम पन्नास ते साठ वर्षांचे असते. त्यातील आपण पंचवीस वर्षे शिक्षणात घालवत असतो. नंतर कामधंदा शोधण्यात दोन चार वर्षे खर्ची पडतात. उरली साधारण तीसएक वर्षे त्यात आपण काय दिवे लावणार. म्हणून माणसाला बुद्धी दिली आहे त्याचा उपयोग कष्ट आणि परिश्रम यातील फरक ओळखायला शिका.
बुद्धीतील फरक ओळखा -
आपल्याला शिकवलेले असते,
"आराम हराम आहे",
"कष्टाला पर्याय नाही",
"कष्ट कर फळाची अपेक्षा करू नको ", "मेहनतका फल मिठा होता है"
बाबा हे सर्व निबंधात लिहायला सोपे आहे, वास्तविक आयुष्यात काय?
दिवसभर रस्त्यावर काम करणारा मजूर काबडकष्ट करतो. त्याला मिळतात चार हजार रूपये, पण गल्ल्यावर बसलेला मालक काम न करता, किंवा वकील काहीही कष्ट न करता, काहीही भांडवल नसताना पैसे किती कमावतो तर महिन्याला वीस हजारांच्या वरच. कारण त्यांनी बुद्धीचा वापर करून घेतला आणि आपले ध्येय ठरवले. माणसाने बुद्धीच्या जोरावर मशिन्सचा शोध लावला आहे. मग त्याचा वापर करून कष्ट कमी करायला पाहिजेत ना.
पुस्तक हाच गुरू -
दुकानात पुस्तके मिळतात, यशस्वी होण्याचे शंभर मार्ग, मी यशस्वी कसा झालो. पण ही पुस्तके लिहीणार्याच्या आयुष्यात डॊकावून पाहिले असता, ती अयशस्वी असतात. म्हणून अशी पुस्तके लिहून पैसे कमावून यशस्वी होतात. यशस्वी होण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती, आजूबाजूचे वातावरण, वैयक्तिक स्वभाव या गोष्टी कारणीभूत असतात. मग पुस्तके वाचून काय हॊणार अशी अनेकांची भावना असते. परंतु पुस्तके वाचन आवश्यक आहेच. कारण विनासायास आणि फुकट काहीही मिळणे अशक्य आहे. या महागाईच्या काळात कार्पोरेट ट्रेनिंग परवडणारे नाही. मग पुस्तकांना गुरू मानून सेल्फ ट्रेनिंग घ्यायला हवे आहे.
आपले ध्येय काय ? -
खूपशी मुले आजुबाजूला बघून आपले ध्येय ठरवित असतात किंवा वडिल म्हणतात त्याप्रमाणे पुढे जातात. मग मुलांच्या मनाचे काय? म्हणून आयुष्याची दिशा ठरवणे अतिशय महत्वाचे आहे. अनेक ठिकाणी दहाचीचे क्लास घेतले जातात. तेव्हा मुलांना समजावून सांगितले जाते. आणि त्याला आयुष्याचे कोष्टक समजावले जाते. मग तो मुलगा अंतर्मुख होऊन विचार करू लागतो आणि मग त्याला काही सांगावे लागत नाही.
व्यवसाय काय देतो -
फक्त पाच वर्ष उत्तम काम -
अनुभवाची गरज नाही -
चांगले मोठे अनुभवी लोक मिळेल -
चांगले मित्र -
चांगले शिक्षण -
उत्तम व्यवसाय -
वशिला नको -
भरपूर पैसा -
मग उच्च जीवनमान -
उत्तम सुस्वरूप मुलीचे स्थळ येणार -
मुलगी सुद्धा शिकलेली असणार -
घरात सुशिक्षीत वातावरण -
समाधानी वृत्ती-
अपत्ये गुणी होणार -
कारण आईवडिल सुशिक्षीत म्हणून संस्कार चांगले -
मुलांचं करियर उत्तम -
काळजी नाही -
म्हातारपण सुखात.....
हे सर्व कशामुळे ?????
तर सतत नाविन्यपूर्ण काम करून चांगले आणि उत्तम वाचन करून व्यवसाय मिळविले तरच....हं!
(© या लेखाचे सर्व हक्क सुरक्षित आहेत.)
श्री. अर्जुन लहानबा सैद पुणे.


0 Comments