शेतकरी शेवटी कर्जबाजारी होतो आणि आत्महत्या होतात | सरकारचे शेती धोरण काय आहे ? जाणून घ्या
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तो बिचारा राब राब राबतो आणि रात्री चटणी भाकरी खाऊन झोपतो. जो दिवसरात्र मेहनत करून सगळ्यांच्या पोटाची भूक भगवतो तोच कधी चटणी भाकर खाऊन तर कधी उपाशी राहतो. खरं तर शेतकरी सर्वात जास्त स्वाभिमानी आहे, त्याला मेहनतीचं खायची सवय आहे तो कधीच फुकटची आशा करत नाही. आज शेतकऱ्यांवर जी वाईट वेळ आली आहे त्याला एकमेव कारणीभूत आहे आपल्याकडील राज्यकर्ते . निवडणूक तोंडावर खोटेनाटे राजकारण करायचं शेतकऱ्यांना भावनिक बनवायचं आणि मते लुबाडायची. कधी नुकसान भरपाई तर कधी पीक विमा तर कधी तुटपुंजी मदत असे आमिष दाखवून शेतकऱ्यांचे मत मिळवले जाते आणि पुन्हा पाच वर्ष त्याच कष्टकऱ्यांची फसवणूक केली जाते. खरतर शेतकऱ्यांना यांची मदत नकोच असते, शेतकऱ्यांना हवा असतो हमी भाव..! जर राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिला आणि शेतकऱ्यांच्या घामाची योग्य किंमत केली तर शेतकऱ्यांवर असे वाईट दिवस येणार नाहीत. |
दिवसेंदिवस शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट होत चालली आहे, खरं तर आपण नेहमी कृषिप्रधान भारताचे गोडवे गात असतो, परंतु आज अख्या भारतातील शेतकरी संकटात आहे. 'प्रत्येकाला शेतकऱ्याचा पुळका आहे पण तो फक्त देखावा असतो. शेतकऱ्यांचा वापर फक्त कष्ट करण्यासाठी आणि मतदानासाठी केला जात आहे' . निवडणूक आली की प्रत्येक नेता शेतकऱ्यांच्या समस्येवर बोलत असतो पण तोच नेता निवडून आल्यावर शेतकऱ्यांवर दुर्लक्ष करतो. आपण मात्र त्या नेत्यांना शेतकऱ्यांचा कैवारी, हितचिंतक असे नाव देतो. आज सर्वात जास्त शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. शेतकरी मात्र प्रामाणिकपणे आपले कार्य अविरतपणे करत आहे.
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तो बिचारा राब राब राबतो आणि रात्री चटणी भाकरी खाऊन झोपतो. जो दिवसरात्र मेहनत करून सगळ्यांच्या पोटाची भूक भगवतो तोच कधी चटणी भाकर खाऊन तर कधी उपाशी राहतो. खरं तर शेतकरी सर्वात जास्त स्वाभिमानी आहे, त्याला मेहनतीचं खायची सवय आहे तो कधीच फुकटची आशा करत नाही. आज शेतकऱ्यांवर जी वाईट वेळ आली आहे त्याला एकमेव कारणीभूत आहे आपल्याकडील राज्यकर्ते . निवडणूक तोंडावर खोटेनाटे राजकारण करायचं शेतकऱ्यांना भावनिक बनवायचं आणि मते लुबाडायची. कधी नुकसान भरपाई तर कधी पीक विमा तर कधी तुटपुंजी मदत असे आमिष दाखवून शेतकऱ्यांचे मत मिळवले जाते आणि पुन्हा पाच वर्ष त्याच कष्टकऱ्यांची फसवणूक केली जाते. खरतर शेतकऱ्यांना यांची मदत नकोच असते, शेतकऱ्यांना हवा असतो हमी भाव..! जर राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिला आणि शेतकऱ्यांच्या घामाची योग्य किंमत केली तर शेतकऱ्यांवर असे वाईट दिवस येणार नाहीत.
आज शेतकऱ्यांचा माल कवडीमोल किमतीने घेतला जातो आणि तोच माल बाजारात नेऊन तिप्पट नफ्यात विकला जातो. ज्याने वर्षभर मेहनत केली, रात्र रात्र जागून पीक वाढवलं त्यांना त्यांच्या मालाची योग्य किंमत न देता जे लोक रातोरात माल फक्त बाजारपेठेत नेतात त्यानं दुप्पट नफा मिळतो, सरकारच्या अशा कपटी धोरणामुळे आज शेतकरी अडचणीत सापडला आहे. आज मार्केटमध्ये प्रत्येक वस्तूची किंमत वस्तू तयार होण्यापूर्वी ठरते. आणि किंमत ठरवण्याचा हक्क उत्पादन करणाऱ्या कंपनीला असतो, मग शेतकरी देखील स्वतः माल पिकवतो मग त्याच्या मालाचा भाव त्याला का ठरवू दिला जात नाही? हेच तर राजकारण आहे..
जर खरंच एखाद सरकार शेतकऱ्यां च्या हिताचे असेल तर त्याने शेतमालाची किंमत आधीच ठरवायला हवी आणि शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करायला हवी तेव्हा शेतकरी सुखी होईल.
@Maharashtraprime News.


0 Comments