शरद पवार यांची संपूर्ण माहिती आणि राजकीय प्रवास | Full information and political journey of Sharad Pawar
शरद पवार यांची संपूर्ण माहिती.
शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तीन त्यांचे आदर्श व्यक्तिमत्व आहेत. शरद पवार यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार आणि त्यांच्या आईचे नाव शारदाबाई पवार असे आहे. शरद पवार यांना एक मुलगी असून तिचं नाव सुप्रिया सुळे आहे . त्या सध्या बारामती मतदार संघाच्या खासदार आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे आहेत.
राजकारण
राजकारणामध्ये शरद पवार यांचा कोणीही हात धरु शकत नाही असं म्हटलं जातं. 1956 साली शरद पवार यांनी शाळेत असताना गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शवण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला आणि तेथूनच त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. कॉलेज जीवनामध्ये विद्यार्थ्यांची नेते म्हणून शरद पवारांनी काम केलं. विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केलं होतं. आणि तेव्हा आज चव्हाण यांच्या सांगण्यावरून पवार साहेबांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले. वयाच्या 24 व्या वर्षी पवार महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले, आणि यातूनच पवारसाहेब आणि यशवंतराव चव्हाण यांच्या मधील संबंध वाढत गेला. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. सन 1966 मध्ये शरद पवारांना युनेस्को शिष्यवृत्ती मिळाली. त्यामध्ये त्यांना पश्चिम जर्मनी, फ्रान्स,इटली, इंग्लंड या देशांना भेट देण्याची संधी मिळाली आणि तेथील राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या पक्षबांधणी करण्याच्या पद्धतीचा जवळून अभ्यास करायला मिळाला.
विधानसभा : वसंतदादाच्या पाठीत खंजीर
इसवी सन 1967 च्या राज्य विधानसभा निवडणुकीत पवार साहेब बारामती मतदारसंघातून विजयी झाले, श्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात पवार यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश वयाच्या 19 व्या वर्षी झाला. सन 1972 आणि सन 1978 सालच्या निवडणुकीतही ते विजयी झाले. आणि त्यानंतर 1978 सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले. यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबरच वसंतदादा पाटील हे देखील शरद पवार यांचे मार्गदर्शक होते, आणि त्याच वेळी काँग्रेस पक्षाचे बारा आमदार फोडून शरद पवार यांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले. आणि याच प्रकरणामुळे शरद पवार यांच्याकडे मुरब्बी राजकारणी म्हणून लोक पाहू लागले. शरद पवार यांनी बारा आमदार फोडून विरोधी पक्षांशी हातमिळवणी केल्यामुळे वसंतदादांचे सरकार पडले. तेव्हा वसंतदादा पाटील शरद पवार यांच्यावर ती खूप नाराज झाले. 'पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला' अशी जळजळीत प्रतिक्रिया वसंत दादा पाटील यांनी दिली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री:
19 जुलै 1978 रोजी शरदचंद्र पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शरद पवारांबरोबर काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले बारा आमदार आणि जनता पक्ष मिळून पुढे पुरोगामी लोकशाही दल या नावाने आघाडी बनवली. आणि या आघाडीचे शरद पवार नेते बनले. शरद पवार हे राज्याचे सर्वात तरूण मुख्यमंत्री होते सन 1980 स* इंदिरा गांधीचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. आणि त्यातच पवारांचे सरकारदेखील बरखास्त झाले जून 1980 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये काँग्रेस पक्षाने 288 पैकी 186 जागा जिंकल्या आणि तेव्हा बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले आणि शरद पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते झाले.
त्यानंतर 1984 ला शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले. पुढे इंदिरा गांधीच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष राज्यातील 48 जागांपैकी केवळ पाच जागा जिंकू शकले. त्यात शरद पवारांच्या बारामती या जागेचा समावेश होता मात्र शरद पवारांनी राष्ट्रीय राजकारणात न पडता काही दिवस राज्याच्या राजकारणातच राहायचे ठरवले. मार्च 1985 ची विधानसभा निवडणूक त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून लढवली. या निवडणुकीत पवार यांना विजय मिळाल्यामुळे त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिला. त्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या पक्षाने 288 पैकी 54 जागा जिंकल्या होत्या आणि पवार राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले.
शरद पवारांची काँग्रेस मध्ये घरवापसी:
1987 साली नऊ वर्षांच्या कालखंडानंतर शरद पवारांनी राजीव गांधीच्या उपस्थित औरंगाबाद1987 साली नऊ वर्षाच्या कालखंडानंतर शरद पवारांनी राजीव गांधीच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे इंदिराकाँग्रेस पक्षात परत प्रवेश केला. जून 1988 मध्ये पंतप्रधान काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून समावेश केला आणि त्यांच्या जागी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांची निवड केली. शरद पवार यांनी 26 जून 1988 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यापूर्वीच्या काळात महाराष्ट्र राज्य मध्ये काँग्रेस पक्षाला फारसे आव्हान नव्हते पण बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष भारतीय जनता पक्षाशी युती करून काँग्रेस पक्षाच्या अनेक वर्षे अबाधित असलेल्या वर्चस्वाला आव्हान देऊ लागला. तेव्हा त्या आव्हानाला तोंड देऊन राज्यात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम राखण्याची जबाबदारी शरद पवार यांच्यावरती आली.
नोव्हेंबर 1989 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र राज्यातील 48 पैकी 28 जागा जिंकल्या पक्षाची वाताहात राजस्थान मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यात झाली तशी महाराष्ट्रात झाली नाही. 1984 च्या तुलनेत पक्षाने 15 जागा कमी जिंकल्या आणि शिवसेनेने चार जागा जिंकून प्रथम लोकसभेत प्रवेश केला.त्याच बरोबर भारतीय जनता पक्षाने 10 जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीमुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागला. राज्य विधानसभा साठी फेब्रुवारी 1990मध्ये निवडणुका होणार होत्या तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याच्या कानाकोपर्यात प्रचारसभा घेऊन काँग्रेस पक्षापुढे मोठे आव्हान उभे केले. राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 288 पैकी 141 तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या युतीने 94 जागा जिंकल्या . राज्याची स्थापना झाल्यानंतर प्रथमच काँग्रेस पक्षाने विधानसभेतील बहुमत गमावले होतं तरी देखील 12 अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर शरद पवार यांनी 4 मार्च 1990 रोजी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. शरद पवार यांच्या मुख्यमंत्री पदावर पक्षांतर्गत अच् काही नेते मंडळींचा आक्षेप होता. 1991 मध्ये विलासराव देशमुख, सुरुपसिंग नाईक आणि इतर काही मंत्र्यांनी शरद पवारांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी पक्षाध्यक्ष राजीव गांधी यांच्याकडे केली ,पण त्याला राजीव गांधी यांनी नकार दिला. त्यानंतर 1991 च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी काँग्रेस पक्षाचा राज्यात एक हाती प्रचार केला पक्षाने राज्यात 48 पैकी 38 जागा जिंकल्या 1989च्या निवडणुकीत झालेल्या तिच्या हत्तीची काही अंशी भरपाई शरद पवारांनी केली निवडणुक प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाली. श्री.पी.व्ही नरसिंह राव आणि अर्जुन सिंग यांच्या बरोबर शरद पवारांचे नाव देखील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत चर्चेत आले. मात्र काँग्रेस संसदीय पक्षाने श्री पी व्ही नरसिंह राव यांना नेतेपदी निवडले आणि त्यांचा 21 जून 1991 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी पार पडला. 1991 पासून तर आजतागायत शरद पवार यांचे नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत चर्चेत असते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना :
त्यानंतर 10 जून 1999 रोजी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.
विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.
सन 2004 मधील लोकसभा निवडणुकीनंतर पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील झाला 22 मे 2004 मध्ये शरद पवारांनी देशाचे कृषीमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली 29 मे इसवी सन 2009 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कृषी ग्राहकांशी संबंधित बाबी अन्न आणि सार्वजनिक वितरण या खात्याची धुरा देण्यात आली जुलै 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्ष कार्याला अधिक वेळ देण्याची इच्छा असल्याचे सांगून पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे त्यांनी आपल्यावरील कार्यभार कमी करण्याची विनंती केली 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला 52 जागा मिळाल्या शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाचे मिळून महाआघाडीचे सरकार महाराष्ट्र मध्ये निर्माण करण्यात आले. हे सरकार स्थापन करण्यामध्ये शरद पवार यांचा मोलाचा सहभाग आहे.


0 Comments