स्वामी विवेकानंद वस्तीगृहातील मुलांचा स्तुत्य उपक्रम, बीड येथील स्वराज्य नगर मधील स्वामी विवेकानंद वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी मोठ्या कठोरतेने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास पाळला आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांना फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला औरंगजेबने पकडले होते, त्यानंतर तब्बल 40 दिवस औरंगजेबने संभाजी महाराजांचे खूप हाल केले, आणि शेवटी हिंदूंच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच पाडव्याच्या दिवशी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना औरंगजेबने ठार केले.
छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म भूमीसाठी स्वतःचा प्राण अर्पण केला परंतु धर्मांतर केले नाही,
त्यांचे हे तेजस्वी बलिदान विसरून कसे चालेल म्हणून त्यांचं बलिदान नेहमी चित्त ठेवण्यासाठी महाराष्ट्रभर बलिदान मास पाळलाच जातो. स्वराज्य नगर येथील मारुतीच्या मंदिरामध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची प्रतिमा ठेवून प्रतिमेचे रोज सायंकाळी सात वाजता नित्य पूजन केले जाते व ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र व संभाजी सूर्यहृदय मंत्र म्हणून महाराजांना अभिवादन केले जाते.
स्वामी विवेकानंद वस्तीगृहातील मुलं मोठ्या संख्येने मंदिरासमोर जमतात आणि नित्यनेमाने बलिदान मासचा कार्यक्रम पार पाडतात. छत्रपती संभाजी महाराज यांनी शेवटच्या दिवशी अन्नत्याग केला होता व चाळीस दिवस खूप हाल सहन केले होते म्हणून या मुलांनी महाराज नित्य स्मरण राहावे म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या आवडीचा खाद्यपदार्थ महिनाभरासाठी सोडला आहे. या संपूर्ण कार्यातून या मुलांचं छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असलेलं प्रेम लक्ष येतं. जगण्याचा मंत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि मरण्याचा मंत्र म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हे या चिमुकल्यांनी जाणलं आहे. हा नित्य उपक्रम फाल्गुन अमावस्या पर्यंत चालणार आहे.

0 Comments