शिवाजी चौक किंवा शिवाजी पुतळा नव्हे, शिवतीर्थ म्हणूया !
श्री छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखिल हिंदुंच प्रेरणास्थान!
महाराज म्हणजे आपल्या हिंदू धर्माचे शिरोमणी!
म्हणून कैक गावात, शहरात, चौकाचौकात आणि मनामनात महाराजांच्या मुर्त्या / स्मारक आपण स्थापन केलेले आहेत!
त्या स्मारकांचा उल्लेख शिवाजी चौक, पुतळा असा आपण नेहमी करतोच...त्यातून एकेरी उल्लेख अनावधानाने होतो...
तो उल्लेख आपण जाणूनबुजून नक्कीच करत नाही; पण तरीही तो होतोच...
तोच उल्लेख आपण आपल्या दैवताचा टाळण्यासाठी आजपासून जिथ जिथं महाराजांची मुर्ती असेल त्या ठिकाणाला "शिवतीर्थ" म्हणून करणार आहोत ;कारण आपल्यासाठी महाराजांची ज्या ज्या ठिकाणी मुर्ती असेल ते पवित्र स्थान, पावन धाम म्हणजेच "तिर्थ"च !त्यामुळे आजपासून शिवाजी महाराजांच्या चौकातील स्थानाला"शिवतीर्थ"म्हणून संबोधून महाराजांच्या पवित्र नावाचा उल्लेख मोठ्या भक्तीभावाने करुया!
आम्ही हे केलयं हा अभिमान नक्कीच आहे पण करता करवीता तो पांडुरंगच;कारण तुकोबाराय म्हणतात ,
नव्हती माझे बोल। जाणा हे सकळ।।
मी आहे मजूर। विठोबाचा।।
अगदी त्याप्रमाणे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हे कार्य विठोबाचे म्हणजे शिवछत्रपतींचे आहे हि भावना ठेऊनच नेहमी करत असते!
यावेळी धारकरी श्री अभिजित भालेकर,Adv.विठ्ठल शेळके,Adv.गणेश बापमारे,Adv.युवराज शेळके, श्री अभय शेळके,शिव भिंगले,ऋषिकेश खोबरे, सार्थक गुगळे इ. धारकरी उपस्थित होते..
इथुन पुढे,भविष्यात खालील संवाद असेल👇
तो-अरे कुठयस रे?
मी-शिवतीर्थाजवळ आहे...
शिवछत्रपतींच्या सन्मानार्थ🙏
अभिमानाने बोला आपल "शिवतीर्थ"💪
जय शिवराय🚩🚩
पोस्ट:
✍️धारकरी-श्री जयराम गिरधारी शेळके..
🙏श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,बीड🚩

0 Comments