Header Ads Widget

राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पारंपारिक गुढी साजरी

 राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पारंपारिक गुढी साजरी

गुढीपाडवा आला की समाज माध्यमांवर काही मेसेजेस फिरत असतात. हे मेसेज गुढीपाडवा सण साजरा करावा की नाही? असा प्रश्न उपस्थित करतात.

गुढीपाडवा आणि संभाजी महाराज यांचे बलिदान यांचा संबंध सांगून गुढीपाडवा सण बंद करण्याचा काही लोकांनी जणू ठेकाच घेतलाय परंतु असे मेसेज पाठवणार्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेचांगली चपराक दिली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना सोबतच गुढी कशी असावी याचा एक फोटो देखील ट्विट केला आहे. अजित दादा पवार यांनी पारंपारक  गुढी उभारून शुभेछा दिल्या आहेत


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीदेखील पारंपारिक पद्धतीने गुढी उभारली आहे.



शरद पवार यांच्या कन्या संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी देखील गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आणि सोबत एक फोटो ट्विट केला आहे. 

 एवढेच काय तर आरोग्यमंत्री राजेश टोपे , काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि अवघ्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब त्यांचे सुपुत्र पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे या सर्व महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी पारंपारिक पद्धतीची गुढी उभारली आहे.

परंतु गुढी बद्दल सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे अशा कुठल्याही मेसेजवर अफवांवर विश्वास न ठेवता आपण आपल्या संस्कृतीचा वारसा जोपासणे हेच हिताचे ठरेल .

महा विकास आघाडी सरकारच्या या नेतेमंडळींनी आपली परंपरा जोपासली आहे आपणही त्यांच्या बरोबर आपली परंपरा जोपासूया .

@महाराष्ट्र प्राईम

Post a Comment

0 Comments