असे करा कुसुम सोलर पंप योजनेचे पेमेंट अपडेट
नमस्कार शेतकरी बांधवांनो कुसुम सोलर पंप योजनेसाठी ज्यांनी ज्यांनी अर्ज भरले होते त्यांना पेमेंट करण्यासाठी एसेमेस आले आहेत. जे जे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत त्यांना पेमेंट ऑप्शन आलेला आहे आणि त्यांना तसे एसएमएस देखील आले आहेत. ज्या शेतकऱ्यांना पेमेंट करण्यासाठी एसेमेस आले आहेत त्यांनी पुढील सात दिवसांमध्ये पेमेंट करणं आवश्यक आहे पेमेंट करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धती वापरू शकता पेमेंट कसं करायचं याबद्दल आजच्या बातमी मधून आपण सविस्तर माहिती घेऊया.
शेतकरी बांधवांनो आपल्याला जो एसेमेस आलेला आहे त्यामध्ये एक पेमेंट साठी लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन स्थिती पाहता येईल तेथेच कष्टमर रिक्वेस्ट दाखवली जाईल ज्यांची विनंती मंजूर झाली आहे त्यांना पेमेंट ऑप्शन दिसेल , त्याच ठिकाणी तुम्ही तुमचे एप्लीकेशन देखील डाऊनलोड करू शकता.
पेमेंट करण्यासाठी आपण तीन पद्धतीचा वापर करू शकता सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता. दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही डिमांड ड्राफ्ट च्या साह्याने पेमेंट करू शकता.
करडईचे तेल देशाला बळकट आणि महासत्ता बनवू शकते
तिसरी पद्धत तुम्ही चलन देखील भरू शकता तुमचा विनंती अर्ज स्वीकारल्यानंतर कष्टमर रिक्वेस्ट वर क्लिक केल्यावर तुम्हाला किती रुपये भरायचे आहेत ही माहिती दिली जाईल त्याप्रमाणे तुम्ही डिमांड ड्राफ्ट किंवा ऑनलाइन किंवा चलनाद्वारे हे पेमेंट भरू शकता. चलन किंवा डिमांड ड्राफ्ट कोणत्या बँकेचं असणार आहे त्याबद्दलची तपशीलवार माहिती तुम्हाला डाऊनलोड केलेल्या फॉर्म वर भरायचे आहे व चलन किंवा डिमांड ड्राफ्ट ची फोटोकॉपी म्हणजेच झेरॉक्स चार दिवसांमध्ये जवळच्या ऑफिसमध्ये म्हणजे डीजे ऑफिसमध्ये जमा करायचे आहे . जर ऑनलाइन पेमेंट करण्यामध्ये म्हणजेच नेट बँकिंगने जर तुम्हाला पेमेंट करता येत नसेल तर तुम्ही डिमांड ड्राफ्ट किंवा चलन भरून पेमेंट भरू शकता.
ऑनलाइन पद्धतीने पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ट्रांजेक्शन डिटेल्स ची कॉपी डाऊनलोड करता येते जी तुमच्याकडे पुरावा म्हणून कायमस्वरूपी असू द्या.
अशाप्रकारे तीनही प्रकारे तुम्ही पेमेंट करू शकता.
तुम्हाला जर पेमेंटचा नोटिफिकेशन म्हणजेच एस एम एस आला असेल तर लवकर पेमेंट करा आणि कुसुम सोलर पंप या योजनेचा लाभ घ्या तुम्हाला ही माहिती नक्कीच फायदेशीर ठरेल धन्यवाद.


0 Comments