बीड :
वीर शिरोमणी श्री महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुसनथान बीड यांच्याकडून महाराणा प्रताप यांना अभिवादन करण्यात आले.
आज वीर शिरोमणी श्री महाराणा प्रताप यांची जयंती अवघ्या देशभरामध्ये साजरी केली जात आहे, बीडमध्ये देखील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बीड या संघटनेकडून दक्षिण मुखी हनुमान मंदिरासमोर असलेल्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला जलाभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला. बीडमध्ये नित्यनेमाने शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाते आज सकाळी ठीक सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून शिवतीर्थ परिवारातील सर्व तरुणांनी दक्षिण मुखी हनुमान मंदिरासमोरील महाराणा प्रताप यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून महाराणा प्रताप यांची जयंती साजरी केली. यावेळी अॅड विश्वजीत काळे, अॅड विठ्ठल शेळके, अभिजीत भालेकर, अक्षय मिटकरी, अविनाश पवार, आशिष शेळके ,गणेश शिंदे,कल्याण सर, ओमकार ढगे, महादेव गायकवाड ,रामभाऊ गोरे, महादेव गायकवाड, आदींची उपस्थिती होती. प्रसंगी विठ्ठल शेळके यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांनी आपलं उभं आयुष्य देव देश आणि धर्मासाठी खर्च केलं, महाराणा प्रताप महापराक्रमी योद्धे होते . मुघलांच्या अत्याचाराने हिंदुस्थान पिळवून निघाला होता. मुघलांच्या विळख्यातून हिंदुस्थानला बाहेर काढण्यासाठी महाराणा प्रताप यांनी आपले उभे आयुष्य खर्च केलं. तत्कालीन मुघल बादशहा अकबर ने महाराणा प्रताप यांना चार वेळा आपले करून घेण्याचा प्रयत्न केला परंतु वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांनी अकबरच्या भिकेला लाथ मारली. महाराणा प्रताप यांना आपल्या हिंदू भूमीला अकबराच्या विळख्यातून बाहेर काढायचं होतं म्हणून त्यांनी आपले कुलदैवत एक लिंगजी यांना साक्षी म्हणून शपथ घेतली जोपर्यंत चितोड गडला मोगलांच्या ताब्यातून बाहेर काढणार नाही तोपर्यंत आसन त्याग करून जमिनीवर बसण्याचा प्रण केला. महाराणा प्रताप यांनी 20000 रजपूत सैनिकांना सोबत घेऊन 80000 मोगलांना सळो की पळो केलं.
महाराणा प्रताप यांनी शरीरामध्ये प्राण असे पर्यंत मातृभूमीची सेवा केली. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांची धर्म भक्ती देशभक्ती आपल्या अंगामध्ये रुजवायला पाहिजे, असे अॅड. शेळके यांनी मनोगत व्यक्त केले.



0 Comments