प्रोफेसर चौकातील सुलभ शौचालय नागरिकांसाठी खुले करा - श्रीनिवास बोज्जा
दि.09/05/2022 ( अहमदनगर )
नगर - सावेडी उपनगरातील एकमेव सुलभ शौचालय नागरिकांसाठी खुले करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी मा. आयुक्त, अहमदनगर महानगरपालिका यांचे कडे केली आहे.
सावेडी उपनगरामध्ये प्रोफेसर चौकातील मनपा शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळ एकमेव सुलभ शौचालय असून सदर चे शौचालय नागरिकांसाठी अचानकपने बंद केल्याचे निदर्शनास आले. वास्तविक संपूर्ण उपनगरामध्ये एकमेव सुलभ शौचालय असून या भागात मोठया प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. हा भाग उपनगरातील मोठे बाजारपेठ आहे तसेच या भागात सायंकाळी मोठया प्रमाणात खाद्य पदार्थांची चौपाटी भरते. अशी परिस्तिथी असतांना अचानक पणे सदरचे शौचालय बंद करणे चुकीचे आहे. अहमदनगर मधील सावेडी प्रोफेसर चौकामध्ये रात्री अपरात्री किंवा दिवसा नेहमी गर्दी असते अशा गर्दीच्या ठिकाणी शौचालयाची सोय असणे अतिशय गरजेचे आहे. प्रोफेसर चौक गर्दीचे ठिकाण आहे आणि अशा गर्दीच्या ठिकाणचे सौचालय अचानक बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
मध्यंतरीच्या काळात या सुलभ शौचालय मध्ये व परिसरात मोठी दुर्गंधी पासरल्या बाबतचे फोटो सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी सावेडीचे प्रभाग अधिकारी यांना पाठवून काळविले असता त्यांनी त्वरित या प्रकरणात लक्ष घालून दुसऱ्याच दिवशी सदर शौचालय व परिसर साफसफाई करून त्या बाबत चे फोटो त्यांना पाठविले ही बाब अभिनंदनिय आहे, परंतु आता अचानक पणे सदर शौचालय नागरिकांसाठी बंद करणे चुकीचे असून सदर शौचालय कोणाच्या आदेशान्वये बंद केली हे समजून येत नाही. सदर बाब गंभीर असून नागरिकांच्या सुविधे साठी त्वरित प्रोफेसर चौकातील शौचालय सुरु करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केली आहे.



0 Comments