Header Ads Widget

बीड जिल्हा परिषदेच्या 69 जागा साठी आरक्षण सोडत

 आगामी जिल्हा परिषद निवडणूक लक्षात घेता आरक्षण सोडत ही खूप महत्त्वाची बाब आहे.

बीड: बीड जिल्हा परिषदेच्या ६९ जागांसाठिची आरक्षण सोडत शुक्रवारी जाहीर करण्यात आली.



बीड जिल्हा राजकारणामध्ये नेहमी अग्रेसर असतो मग त्या स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका असो किंवा विधानसभा आणि लोकसभा निवडणुका असो , बीडच्या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेलं असतं . थोड्याच दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या 69 जागांसाठी आरक्षण सोडत झाली आहे.

 बीड जिल्हा परिषदेच्या एकूण 69 जागा साठी आरक्षण सोडत जाहीर झाले आहे. बीड जिल्हा परिषदेचे आरक्षण पुढीलप्रमाणे राहणार आहे.

जिल्हापरिषदेसाठी जाहिर झाले आरक्षण:

बीड: बीड जिल्हा परिषदेच्या ६९ जागांसाठिची आरक्षण सोडत शुक्रवारी जाहीर करण्यात आली. एससी ८, एसटी १, ओबीसी १८ तर खुल्या प्रवर्गातील महिलांसाठीच्या २१ जागा आरक्षीत करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत झाली. 

यात आरक्षीत गट असे आहेत

एससी: उमापुर,    मोगरा, किट्टीआडगाव, पिंपळनेर, चौसाळा, मुर्शदपुर, होळ, भोगरवाडी, बर्दापुर हे गट एससीसाठी आरक्षीत करण्यात आले आहेत. त्यापैकी 

उमापुर, मुर्शदपुर, भोगलवाडी, पिंपळनेर, किट्टीआडगाव हे पाच गट एससी महिलांसाठी राखीव झाले.


https://youtu.be/p2DiWn3KXco

एसटी: जिरेवाडी 

ओबीसी: रेवकी, तलवाडा, पाडळसिंगी, जोगाईवाडी, पात्रुड, दिंद्रुड, नाळवंडी, रायमोह, डोंगरकिन्ही, बीड सांगवी, आष्टा, तेलगाव,पिंप्री, सिरसाळा, धर्मापुरी, पट्टीवडगाव,मादळमोही, मातोरीया गटांचा समावेश आहे. 

यापैकी रेवकी, बीड सांगवी, तलवाडा, मातोरी, डोंगरकिन्ही,नाळवंडी, पाडळसिंगी, पिंप्री,जोगाईवाडी हे ९ गट ओबीसी महिलांसाठी राखीव आहेत. तर

सर्वसाधारण महिला: ताडसोन्ना, पाडळी, सौताडा, दौलावडगाव, धानोरा, आडस, आसरडोह, चनई, गढी, सादोळा, चिंचोली माळी, टोकवाडी,टाकरवण, धोंडराई, पाली, दाऊतपुर, घाटनांदूर, वीडा, राजुरी, बहिरवाडी , नागापूर या गटांचा समावेश आहे.

Post a Comment

1 Comments