15 आमदारांच्या विरोधामुळे शिंदेघटाची अडचण वाढली
मुंबई : शिंदे सरकारची भवितव्य ठरवणारे सुनावणी 12 तारखेवर पुढे ढकलली आहे. आमदारांच्या निलंबनावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती परंतु ही सुनावणी आता 12 ऑगस्ट रोजी होणार असल्यामुळे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचं भिजत घोंगडं कायम राहिला आहे.
न्यायालयात नुकत्याच झालेल्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश आणि शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांचा फसलेला युक्तिवाद पाहता शिंदे गटात नाराजीचे चिन्ह आहे, सर्व शक्ती पणाला लावून भाजपने सत्ता स्थापन केली परंतु आता भाजपमध्येही धाकधुकीचे वातावरण तयार झालं आहे. याबरोबरच केंद्रीय निवडणूक आयोगाची आज सुनावणी होणार आहे . खरी शिवसेना नेमकं कोणाची ही आयोगाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे . सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला पक्षचिन्ह बाबत घाई करू नकाअसे आव्हान केले आहे. त्यामुळे सुनावणी बाबत संभ्रमाचे प्रश्नचिन्ह आहे.
दरम्यान या सत्ता संघर्षात ऐनवेळी भाजपमध्ये विलीनीकरण करण्याची वेळ आली तर भाजप मधील विलीनीकरणाला 15 आमदाराने विरोध दर्शवला आहे, त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांच्या घरी या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठकी घेतल्या जात आहेत.
या सगळ्या अडचणीमुळे शिंदे गटांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे अशातच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्या विरोधात भूमिका घेत आदित्य ठाकरे यांना सहानुभूती दिली आहे. शहाजी बापू पाटील यांनी शिंदे व ठाकरे यांनी एकत्रित यावे असा आशावाद व्यक्त केल्यामुळे राजकीय वर्तुळात गोंधळ उडाला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून निर्माण झालेला सत्ता पेज आज सुटेल असं सर्वांनाच वाटलं होतं परंतु दिवसेंदिवस तारीख पे तारीख येत असल्यामुळे जनतेमध्ये देखील असंतोष निर्माण होत आहे.


0 Comments