Eknath Shinde: केंद्र महाराष्ट्राला भरी उन्निधी देणार नीती आयोगाच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषद घेऊन नीती आयोगामध्ये महाराष्ट्राला भरीव निधी मिळणार असल्याचं सांगितला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच दिल्ली दौऱ्यावरून महाराष्ट्रात परतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्ली येथे नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीला एकनाथ शिंदे देखील हजर होत, सध्या नीती आयोगातील विविध मुद्दे चर्चेत आले आहेत यातच एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये तिसऱ्या क्रमांकाला उभ केलं असल्यामुळे नीती आयोगाची बैठक जोरदार चर्चेत आहे.
नीती आयोगाच्या बैठकीला एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. त्यामुळे महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार याबाबत देखील चर्चा झाली असल्याचं समोर आला आहे. दरम्यान निती आयोगाच्या बैठकीनंतर सोशल मीडिया वरती एक फोटो चांगलाच व्हायरल झाला ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांना तिसऱ्या क्रमांकावर स्थान दिले होते. जीडीपी मध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा असून देखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तिसऱ्या क्रमांकावर उभं केलं या मुद्द्यावरून विरोधकांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरून मुंबईला परतल्यावर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये दिल्लीच्या त्या बैठकीत काय निर्णय झाले याचा खुलासा केला. केंद्र महाराष्ट्राला भरीव निधी देणार असल्याचं या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मुख्यमंत्री काय म्हणाले : नीती आयोगाच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला केंद्र भरीव निधी देणार असल्याचे सांगितलं. या निधीतून महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्प मार्गी लागतील असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी ही विविध योजना आपण या निधीतून राबवणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितल आहे. TET घोटाळ्यात शिंदे गटातील अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावे आली आहेत त्यामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे, या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी या विषयावर बोलण्याचे टाळलं; तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांनी देखील हा आरोप फेटाळून लावला आहे.


0 Comments