TET SCAM : टीईटी घोटाळा प्रकरण उघड; अब्दुल सत्तार यांच्या दोन्हीही मुलींचे प्रमाणपत्र रद्द अटक होणार?
संभाजीनगर : TET शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये घोटाळा झाला असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात काही जणांना अटक देखील झाले आहे आता या प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे आली आहेत.
गेल्या अनेक दिवसापासून शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी मध्ये घोटाळा झाल्याचे समोर आला आहे यामध्ये अनेक जणांना अटक देखील करण्यात आली आहे, इडी कडून (ED) देखील या प्रकरणाची समांतर चौकशी सुरू आहे, आता या प्रकरणात शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे आली आहेत. टीईटी मध्ये घोटाळा केल्या प्रकरणी अब्दुल सत्तार यांच्या दोन्हीही मुलींचे प्रमाणपत्र रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य भरतीत झालेल्या घोटाळ्याची तपासणी सुरू असतानाच आता टीईटी मध्ये घोटाळा झाला असल्याचे देखील उघड झाला आहे. आरोग्य सेवेत झालेला घोटाळा याबाबतीत पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे अशातच आता टीईटी बद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घोटाळ्यामध्ये परीक्षा घेणाऱ्या खाजगी कंपन्यांचे संचालक तसेच विद्यार्थी आणि परीक्षा परिषदेतील काही अधिकारी यांच्या संगनमताने हा घोटाळा झाल्याचं बोललं जात आहे.
परीक्षेत गैरव्यवहार करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर :
परीक्षा परिषदेकडून टीईटी परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी घोटाळा केला किंवा गैर व्यवहार केला त्यांची नावे जाहीर करण्यात आले आहेत.
या यादीत तब्बल 7874 विद्यार्थ्यांची नावे आहेत या सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून त्यांना यापुढे ही परीक्षा देता येणार नाही. टीईटी परीक्षेत घोटाळा केल्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे या प्रकरणात सिल्लोड चे आमदार माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावे आहेत त्यांचे देखील प्रमाणपत्रे रद्द करण्यात आले आहेत. हिना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख यांच्याही नावाचा समावेश असल्याची माहिती 'सामना' या वृत्तपत्राने दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अब्दुल सत्तार यांच्या काही शैक्षणिक संस्था आहेत आणि याच शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांच्या दोन्ही मुली कार्यरत आहेत. टीईटी घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्या दोन्हीही मुलींचे प्रमाणपत्र रद्द करून त्यांनाही यापुढे परीक्षा देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.



0 Comments