रायगडावरील अनधिकृत बांधकामाच्या विरोधात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे बीड जिल्हाधिकाय्रांना निवेदन.
प्रतिनिधी: हिंदवी स्वराज्याची राजधानी श्री किल्ले रायगडावर अनधिकृतपणे काही समुहाने रंगरंगोटी करून चादरी चढवण्याच्या बातम्या आणि फोटो गेले दोन दिवसांपासून समाजमाध्यमात फिरत असून; यामुळे संबंध महाराष्ट्रात असंतोषाची लाट आहे. किल्ले रायगड हि सर्व हिंदूसाठी पवित्र जागा असुन या ठिकाणी असे अपवित्र काम झाल्याने सर्व दुर्गप्रेमी आणि शिवभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे.
यासंबंधी अजून माहिती अशी की, पुर्वी याठिकाणी सैनिकांची बसण्याची जागा म्हणजे मदार मोर्चा होता आणि त्या सैनिकांच्याच सोमजाई आणि झोलाई देवतांची स्थान त्या ठिकाणी होती.जी ईंग्रजांच्या काळात भग्नावस्थेत गेली आणि आज याच पवित्र ठिकाणांवर एका समुहाने हा अपवित्र प्रकार केल्याने सर्व शिवभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे.
आपले किल्ले शिवछत्रपतींचा आणि संभाजी महाराजांचा तसेच सर्व मावळ्यांचे जिवंत स्मारक आहेत. ते पडलेल्या अवस्थेत असले तरी आजही ते प्रेरणादायी तिर्थक्षेत्र असुन या पवित्र स्थळांवर असे अपवित्र कार्य होतातच कसे असा प्रश्न जनतेतून उमटत आहे.
हिंदवी स्वराज्याची राजधानी श्री किल्ले रायगड हे अखंड हिंदुस्थानचे प्रेरणा आणि बलस्थान आहे. या ठिकाणी असलेल्या देवी दैवतांच्या मूर्ती आणि मंदिरांची अनेक वेळा काही समाजकंटकांकडून विटंबना केली जात आहे हे त्वरित थांबवायला पाहिजे आशी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बीड विभाग व संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींची मागणी आहे.
यासंदर्भात आज बीडमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे मा.जिल्हाधिकाय्रांना निवदेन देऊन किल्ले रायगडावरील अनधिकृतपणे अपवित्र काम तात्काळ थांबवून यासंबंधीत जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी श्री मयुर भालेकर, अँड अमर बावचकर ,अँड गणेश बापमारे,अँड विठ्ठल शेळके,शुभम शेनकुडे, अजय राऊत उपस्थित होते.

1 Comments
🚩🚩🙏🙏
ReplyDelete