बीड : शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांचं अपघाती निधन
शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांचे आज पहाटे कार अपघातात निधन झालं. मराठा आरक्षणाच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी विनायक मेटे बीड वरून मुंबईसाठी पहाटे निघाले होते. मुंबईच्या दिशेने येताना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ 14 ऑगस्ट रोजी पहाटे 5:30 सुमारास त्यांच्या कारला अपघात झाला. अपघातात विनायक मेटे त्यांचा बॉडीगार्ड व ड्रायव्हर गंभीर जखमी झाले. विनायक मेटे यांच्या पायाला हाताला आणि डोक्याला जबर मार लागला होता. अपघातानंतर तब्बल एक ते दीड तास त्यांना कुठलीही मदत मिळाली नाही. विनायक मेटे यांच्या गाडीला एका ट्रकने कट मारला होता त्यातच हा अपघात घडला आणि त्यांच्या गाडीची डावी बाजू चक्कासुर झाली.
नंतर विनायक मेटे यांना मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभाग आयसीयू मध्ये उपचार सुरू होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला होता. विनायक मेटे हे एक अत्यंत संघर्षशील नेते होते असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणाचा लढा विनायक मेटे यांनी लढवला आणि वेळोवेळी पाठपुरावा देखील ते करत होते असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की विनायक मेटे हे एक चळवळीचे नेते होते मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी नेहमीच त्यांची धडपड होती. आज देखील ते मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठीच मुंबईला येत होते अशातच त्यांच दुर्दैवाने अपघाती निधन झाल.


.jpeg)
0 Comments