नमस्कार आपले सर्वांचे प्रथम स्वागत करत आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण लेक लाडकी योजना 2023 या विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. काय आहे लेक लाडकी योजना?
फॉर्म, कागदपत्रे, पात्रता, नोंदणी संपूर्ण माहिती|Lek Ladki Yojana 2023 Maharashtra
लेक लाडकी योजना 2023 महाराष्ट्र नेमकं ही योजना काय आहे. महाराष्ट्रातील लेक लाडकी योजना कोणी चालू केली. महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडून गुरुवारी विधानसभेत आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी देवेंद्र फडवणीस यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण योजनेची घोषणा केली. यामध्ये 'लेक लाडकी योजना' अत्यंत लक्षवेधी ठरली. महाराष्ट्र शासनाच्या या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केसरी राशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. त्यानुसार मुलींच्या जन्मानंतर तिच्या नावावर 5000 रुपये जमा केले जातील. त्यानंतर चौथीत असताना 4000 रुपये, सहावीत असताना 6000 रुपये आणि मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यावर 8000 रुपये जमा केले जातील. लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख मिळतील, असे राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
लेक लाडकी योजना 2023 पात्रता कोण घेऊ शकतो लाभ/ Lek Ladki Yojana 2023 Eligibility Criteria-
महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 पात्रता काय आहे? या योजनेसाठी कोन फार्म किंवा अर्ज करू शकतो. लेक लाडकी योजनेसाठी कोण कोणते महत्त्वाचे नियम व अटी आहेत याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
1.महाराष्ट्र लेक लाडकी योजनेसाठी पात्र असणारा उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
2.लेक लाडकी योजना 2023 फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी आहे.
3.महाराष्ट्र बाहेरील मुली या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
4.राज्यातील पिवळे व केसरी राशन कार्ड धारक कुटुंबात मुली या योजनेसाठी पात्र राहतील.
5.या योजनेसाठी लाभार्थी मुलीचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
लेक लाडकी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे/ Lek Ladki Yojana Document List
लेक लाडकी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोण-कोणती आहेत. याची माहिती सविस्तर पाहणार आहोत.परंतु अजून अधिकृतपणे कोण कोणते आवश्यक कागदपत्रे लागतील अशी माहिती समोर आलेली नाही. परंतु सुकन्या समृद्धी योजनेनुसार पुढीलप्रमाणे कागदपत्रे लागू शकतात. तरी सुद्धा शासन नियमानुसार आवश्यक कागदपत्रांची यादी आल्यावर माहिती अपडेट करण्यात येईल.
1.मुलीच्या आई वडीलांचे आधार कार्ड.
2. मुलीचे आधार कार्ड.
3. मुलीचा जन्म दाखला.
4. महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा दाखला.
5. पासपोर्ट साईज फोटो.
6. मोबाईल नंबर, ईमेल आयडी.
7. बँक खाते पासबुक.
लेक लाडकी योजनेचे फायदे/ Lek Ladki Yojana 2023 Benifits.
महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचे फायदे काय आहेत. योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे याची माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत.
1.मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या नावावर 5,000 हजार रुपये जमा केले जातील.
2.मुलगी चौथीत असताना 4,000 हजार रुपये मुलीच्या नावावर जमा केले जातील.
3.मुलगी सहावीत असताना 6,000 हजार रुपये मुलीच्या खात्यावर जमा केले जातील.
4.मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यावर 8,000 हजार रुपये जमा केले जाते.
5.लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष झाल्यानंतर तिला 75,000 हजार रुपये रोख मिळतील.
असे करून जमा केलेले पैसे आणि एक लाडकी योजनेचा मिळणार लाभ अशी दोन्ही रक्कम मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर 1,00,000 लाख रुपये रोख मिळणार.
महाराष्ट्र एक लडकी योजना 2023 चा उद्देश काय आहे.
महाराष्ट्र सरकारने एक लाडकी योजना सुरू केली आहे. पण या मागील उद्देश काय आहे हे जाणून घेणे पण महत्वपूर्ण आहे. लेक लाडकी अभियान व योजनेअंतर्गत देशातील गरीब कुटुंबातील मुली तिच्या जन्म पासून ते तिच्या पूर्ण शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करणे. तिचा विकास व्हावा आणि पूर्ण शिक्षण व्हावे हा लेक लाडकी योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच मुलींच्या गर्भपात वर आळा घालणे. तसेच मुलीच्या जन्मानंतर सकारात्मक दृष्टिकोन होणे. तसेच मुलीचे उज्वल भविष्यासाठी लेक लाडकी वरण सुरू करण्यात आली आहे.


0 Comments