बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाला नवीन निवडणूक चिन्ह मिळाल आहे.
एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे तीन वेगवेगळ्या चिन्हांची मागणी केली होती. यामध्ये उगवता सूर्य ढाल तलवार स्मशाल या चिन्हांचा समावेश होता. काल निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना स्मशाल हे चिन्ह देण्यात आलं यानंतर एकनाथ शिंदे गटाला कोणतं चिन्ह दिल जाणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं. आज एकनाथ शिंदे यांच्या गटाला म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना यांना देखील नवीन निवडणूक चिन्ह मिळाला आहे ढाल तलवार हे बाळासाहेबांची शिवसेना यांचं चिन्ह असेल. यापूर्वी शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाने शिंदे गटाचा चिन्हांची मागणी केलेला प्रस्ताव फेटाळला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाने 11ऑक्टोबरला नव्याने चिन्हाची यादी तयार करून निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठवला होता यामध्ये तुतारी, ढाल तलवार ,पिंपळ, रिक्षा, तळपता सूर्य या चिन्हांची मागणी केली होती. यापैकी ढाल तलवार हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळाल आहे.
त्रिशूल आणि तळपता सूर्य या चिन्हांशी धार्मिक भावना जोडलेल्या आहेत यामुळे शिंदे गटाला त्रिशूल आणि तळपता सूर्य हे चिन्ह मिळाले नाहीत तर शिंदे गटाला नवीन चिन्ह ढाल तलवार हे मिळालं आहे.
मशाल हे चिन्ह उपलब्ध निवडणूक चिन्हांमध्ये नव्हतं ते यापूर्वी समता पक्षाने घेतलं होतं, परंतु 2004 मध्येच समता पक्ष बरखास्त झाला त्यामुळे हे चिन्ह उद्धव ठाकरे गटाला देण्यात आलं.
शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) या नावाची दोन्हीही गटाने मागणी केल्यामुळे दोघांनाही हे नाव देता आलं नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव ठाकरे गटाला देण्यात आलं तर बाळासाहेबांची शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे गटाला देण्यात आले.
त्रिशूल, गदा, तळपता सूर्य हे चिन्ह धार्मिक भावनांशी जोडलेले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला (बाळासाहेबांची शिवसेना ला) निवडणूक आयोगाने ढाल तलवार हे चिन्ह दिलं आहे.


1 Comments
खूप छान
ReplyDelete