Header Ads Widget

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अक्षदा आणि हार्दिक लग्नाच्या बेडीत

 तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अक्षदा आणि हार्दिक लग्नाच्या बेडीत.

अक्षदा आणि हार्दिक यांच्या विवाहातील सप्तपदीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वरती व्हायरल होत आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला राणादा म्हणजेच हार्दिक आणि पाठक बाई म्हणजे अक्षदा त्या दोघांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला आहे. विवाह प्रसंगातील काही व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वरती जोरदार व्हायरल होत आहेत.





मराठी कला विश्वातील दमदार जोडी हार्दिक जोशी अक्षदा देवधर हे दोघे विवाह बंधनात अडकले आहेत. 

सप्तपदी घेत राणादा - पाठक बाईंनी लग्न गाठ बांधली. अक्षदा आणि हार्दिक चा शाही विवाह सोहळा पुणे या ठिकाणी पार पडला. अक्षदा आणि हार्दिक यांचे मित्र नातेवाईक यांच्या साक्षीने विवाह बंधनात अडकून त्यांनी नवीन आयुष्यात प्रवेश केला आहे. मुख्य आकर्षण म्हणजे अक्षदा ने हाताने विणलेली जरी पैठणी साडी नेसून आपली परंपरा झोपली होती याबरोबरच हार्दिक देखील मराठमोळ्या धोतराच्या लूकमध्ये राजबिंडा दिसत होता.

सध्या राणादा आणि पाठक बाईंचा लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमशान घालत आहे.

राणादा पाठक बाईंचा सप्तपदीचा व्हिडिओ 'मराठी मीडिया' या instagram वरून पोस्ट करण्यात आला होता. बऱ्याच दिवसापासून हार्दिक आणि अक्षदाच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती हळदीची देखील जोरदार तयारी झाली होती. हळदी समारंभामध्ये काढलेल्या फोटोने देखील सोशल मीडिया वरती धुमाकूळ घातला होता याबरोबरच आता लग्नातील सप्तपदीच्या व्हिडिओ बरोबरच फोटो देखील व्हायरल होत आहेत.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अक्षदा आणि हार्दिक च्या लग्नाची संपूर्ण महाराष्ट्राला चाहूल लागली होती त्यामुळे अक्षदा आणि हार्दिक च्या लग्नाची उत्सुकता चाहते मंडळींमध्ये  होती. राणादा आणि पाठक बाई लग्नाच्या पिढीत अडकल्यानंतर चाहते मंडळीकडून त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.




Post a Comment

0 Comments