"व्यर्थ न हो बलिदान धर्मवीर" छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने ५१ शंभुभक्तांनी केले रक्तदान.
बीड : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने बीड शहरातील आणि परीसरातील ५१ तरुणांनी सोमेश्वर मंदिर या ठिकाणी मंगळवार दिनांक:-२१/०३/२०२३ रोजी रक्तदान केले.तसेच शंभूराजांच्या बलिदानाला स्मरून श्रद्धांजली म्हणून श्री शिवतीर्थ ते सोमेश्वर मंदिरापर्यंत मूकपद यात्रा काढण्यात आली याबाबत सविस्तर माहिती अशी की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने पकडल्या गेल्या क्षणापासून ते त्यांचा जीव जाईपर्यंत ४०दिवस हालहाल करून यातना देऊन मारले.. या ४०दिवसांत संभाजी महाराज औरंग्यापुढे झुकले नाहीत की याचना केली नाही, मोठ्या
धीरोदात्तपणे राजांनी देवदेशधर्मासाठी मरण स्विकारले.
या ४०दिवसांत संभाजी महाराजांना ज्या यमयातना झाल्या त्या लक्षात घेऊन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बीड मधील व आसपासच्या खेड्यापाड्यातील हजारो तरुणांनी संपूर्ण फाल्गुन महिना आवडीच्या गोष्टीचा त्याग करून दररोज संभाजी महाराजांना आदरांजली वाहुन बलिदानमास पाळला.. महिनाभर संभाजी महाराजांवर अत्याचार झाल्यानंतर औरंगजेबाने महाराजांना पाडव्याच्या आदल्या दिवशी यासाठी मारले की हिंदूंनी दुसऱ्या दिवशीचा पाडवा साजरा करु नये. असा इतिहास सर्वांनाच माहिती आहे... हेच लक्षात घेऊन या तरुणांनी संपूर्ण फाल्गुन महिना उपवास केला आवडते पदार्थ सोडले धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी आपल्या मायभूमीसाठी देव देश धर्मासाठी संपूर्ण महिनाभर मरण यातना सहन केल्या त्याची जाणीव ठेवून संभाजी महाराजांचे दररोज स्मरण व्हावे या हेतूने शंभू भक्तांनी संपूर्ण महिनाभर उपवास केला व प्रत्येक दिवशी संभाजी महाराजांना आदरांजली वाहिली व 20 मार्च 2023 रोजी धर्म पंढरी वडू बुद्रुक छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ या ठिकाणाहून धर्मवीर ज्वाला बीड येथे आणण्यात आली . संभाजी महाराज अमर झाले तो दिवस म्हणजे मृत्युंजय अमावस्या त्या दिवशी दिनांक 21 मार्च 2023 रोजी बीड येथील शंभू भक्तांनी रक्तदान करून संभाजी महाराजांना वंदन केले.
यावेळी श्री. जयराम भाऊ शेळके म्हणाले की, श्री शिवाजी श्री संभाजी रक्तगताचा तरूण उत्पन्न व्हावा म्हणून, "संपूर्ण फाल्गुन महिना संभाजी महाराजांच्यावरील अन्यायाविरुद्ध आपणही संभाजी महाराजांसारखे देवदेशधर्मासाठी करारी आणि स्वाभिमानी बाणा तेवत ठेवावा या उद्देशाने श्री संभाजीराव भिडे गुरुजींनी गेल्या चाळीस वर्षांपासून हा बलिदानमास नावाचा पुण्यवान उपक्रम संपूर्ण हिंदू समाजाला दिला ,तोच वारसा आम्ही आमच्या श्वासात श्वास असेपर्यंत पाळु."
यावेळी बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.शहादेव नन्नवरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शंभूराजांच्या बलिदानाचे महत्त्व तसेच रक्तदानाचे महत्त्व सर्वाँना सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितांमध्ये ॲड.स्वप्नील भैया गलधर, ॲड.लहुराव पोपळे साहेब, ॲड. गोविंद शिराळे साहेब तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री.गोरख भाऊ शिंदे,श्री.सतीश अण्णा सपकाळ प्रा.भुसारी सर श्री.गोरक्षनाथ आबुज सर श्री.दादासाहेब नन्नवरे उपस्थित होते.तसेच शासकीय रुग्णालय बीड येथील रक्तपेटीचे प्रमुख श्री काळे सरांचे सहकार्य लाभले,या सर्व कार्यक्रमासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बीडच्या सर्व तरुणांनी रक्तदान करून आपले धर्मकर्तव्य पार पाडले.



0 Comments