जलजीवन मिशन योजनेच्या कामासाठी निमगाव ग्रामपंचायत मध्ये रस्सीखेच
गावोगावच्या पाण्याच्या समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने घर तिथे पाणी देण्यासाठी 2019 मध्ये जलजीवन योजनेची घोषणा केली होती. सध्या चल जीवन योजनेअंतर्गत देशभरामध्ये कामाची सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील गाव खेड्यांमध्ये या योजनेचे मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्हा दुष्काळी भागात येत असल्याने बीडमध्ये नेहमीच पाण्याच्या टंचाईची जाणीव होते. बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील निमगाव मयंबा ग्रूप ग्रामपंचायत निवणूक पार पडून चार महिने उलटले आहेत. ग्रामपंचायत सत्ता बदल झाल्यामुळे नवनिर्वाचित सरपंच सौ मंगल महादेव घुंगरड यांनी विकास कामाचा धडाका लावला आहे. निमगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या निमगाव, लामानवाडी, नारायण वाडी व वारंगल वाडी येथील जलजीवन योजनेचे काम लवकरच सुरू होणार आहेत. या कामाचे गुत्तेदारांनी टेंडर भरलेले आहेत, गुुत्तेदारांकडून हे काम मिळवण्यासाठी चारही गावातील सदस्यांची रस्सीखेच सुरू आहे.
85 लाखाची योजना बोगस होऊ देणार नाही
नारायण वाडीला केंद्र सरकारने दिलेली जलजीवन योजना ही 85 लाखाची योजना आहे . या योजनेमध्ये भ्रष्टाचार करून स्वतःचे खिसे भरण्यासाठी काही सत्तापिसाट लोक गुत्तेदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. हे काम बाहेरच्या लोकांना दिले जाऊ नये म्हणून तहसील कार्यालय शिरूर व जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्याकडे अर्ज स्वरूपात गावकरी मागणी करणार आहेत. जल जीवन योजनेत गावकरी स्वतः लक्ष घालणार असल्यामुळे या योजनेत भ्रष्टाचार होऊ देणार नाहीत असे नारायणवाडीतील नागरिकांचे म्हणणे आहे.
निमगाव ग्रामपंचायत ही पाच गावाची ग्रुप ग्रामपंचायत असल्याने ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कामासाठी नेहमीच संघर्ष करावा लागतो. सध्या नारायणवाडी येथील जलजीवन योजना हा चर्चेचा विषय बनला आहे. नारायण वाडी येथील जलजीवन योजनाचे काम गावातील लोकांना करून द्यावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे. आम्ही विकास कामाच्या मुद्द्यावर आणि दर्जेदार कामे व्हावेत यासाठी सत्तापालट केली आहे. परंतु राजकीय वर्चस्व असलेल्या काही लोकांनी ह्या योजना स्वतःच्या घशात घालण्याचा प्रयत्न चालवला आहे असं गावकऱ्यांचे म्हणणं आहे. नारायण वाडीतील जलजीवन योजना बाहेरच्या गुत्तेदारांना किंवा दुसऱ्या गावातील व्यक्तींना करून देणार नाहीत असा गावकऱ्यांचा सूर आहे. नारायण वाडीच्या योजना नारायण वाडीतील लोकांनाच करून द्याव्यात अशी मागणी नवनिर्वाचित सरपंच मंगल महादेव घुंगरड व ग्रामसेवक सानप साहेब यांच्याकडे केली आहे. नारायण वाडी मध्ये माजी मंत्री सुरेश आण्णा धस यांना मानणारा खूप मोठा चाहता वर्ग आहे, त्यामुळे हे काम गावकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. कामाची गुणवत्ता वाढवण्यासाठी व कामांमध्ये भ्रष्टाचार होऊ नये यासाठी गावकऱ्यांकडून समिती नेमण्यात आली आहे. आधीच्या सत्ताधाऱ्यांना कंटाळून नारायणवाडीकरांनी सत्ता पालट केली परंतु हे काम आधीच्या सत्ताधाऱ्यांना मिळणार असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. आधीच्या सत्ताधाऱ्यांनी यापूर्वी केलेल्या कामाचा कोणताही अहवाल गावकऱ्यांना दाखवला नाही किंवा कोणत्याही कामांमध्ये गावकऱ्यांचा विश्वास घेतला नाही त्यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यापूर्वी देखील गावकऱ्यांना नारायणवाडी ते निमगाव या रस्त्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला. यापूर्वी नारायणवाडी मध्ये ग्रामपंचायत अंतर्गत झालेली कामे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे जलजीवन योजनेचे काम स्वतः गावकरी लक्ष घालून पूर्ण करणार आहेत.
जलजीवन योजना हेच आमचे जीवन
घरोघरी पाण्याची सुविधा मिळावी म्हणून केंद्र सरकारने जलजीवन योजना दिली आहे ही योजना दर्जेदार व्हावी, जल जीवन योजना सारख्या योजना पुन्हा पुन्हा होत नाहीत त्यामुळे ही योजना गावातील व्यक्तींनी करावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे. जर ही योजना आधीच्याच लोकांना दिली जाणार असेल तर गावकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणार असल्याचे देखील बोलले जात आहे. जर परत परत त्याच लोकांना कामे द्यायचे असतील तर सरकारने निवडणुका घेऊ नयेत. गावचा विकास व्हावा भ्रष्टाचार थांबावा या मुद्द्यावर आम्ही निवडणुका लढतो निवडणुका लढवून सत्तापालट होऊन देखील जर आधीच्या लोकांना हे कामे दिले जात असतील तर आम्ही संघर्ष करायला तयार आहोत असेही नारायणवाडीतील गावकऱ्यांचे म्हणणे आहे.



0 Comments