Header Ads Widget

भारत ठरला जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश

 India population 2023: भारताची सध्याची एकूण लोकसंख्या किती असेल? धक्कादायक माहिती भारताच्या समोर..!                                       

पहिल्यांदाच भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरला आहे. भारताची सध्या लोकसंख्या चीन पेक्षाही जास्त. 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटी होती. त्यामध्ये पुरुषाची लोकसंख्या 67 कोटी 32 लाख एवढी होती आणि महिलांची लोकसंख्या 58 कोटी 64 लाख होती. 2023 मध्ये चीनला मागे टाकत आता भारताची लोकसंख्या 142.86 कोटी झाली आहे.

भारताची लोकसंख्या किती आहे? पण जनगणना केल्याशिवाय भारताच्या लोकसंख्येचे अचूक आकडे शोधणे फार अवघड आहे. भारताची लोकसंख्या ही प्रत्येक 10 वर्षाला मोजली जाते, जनगणना केली जाते. देशातील शेवटची जनगणना ही 2011 मध्ये झाली होती. जनगणनेनुसार, त्यावेळी भारताची एकूण लोकसंख्या 121 कोटी होती. लोकसंख्येनुसार चीन नंतर भारताचा क्रमांक लागतो.


2021 मध्ये भारताची नवीन जनगणना होणार होती.2021 मध्ये भारताच्या जनगणनेला दहा वर्षे पूर्ण झाली होती, परंतु कोविड-19 ह्या महामारीमुळे जनगणना ही पुढे ढकलण्यात आली. 

जगातील सर्वात जास्त तरुण असलेला देश बनला भारत  

UNFPA अहवालात नमूद केल्याप्रमाणे, भारतातील 25% लोकसंख्या 0-14 या वयोगटातील आहे, 18% लोकसंख्या 10-19 या वयोगटातील आहे, 26% लोकसंख्या 10-24 वयोगटातील आहे, 68% लोकसंख्या ही 15-64 वर्ष वयोगटातील आहे आणि 7% लोकसंख्या 65 वर्ष वयोगटावरील आहे.

भारताची लोकसंख्या ही चीन पेक्षा जास्त

म्हणून जगातील सर्वाधिक लोकसंख्येला असलेला देश चीन नसून आपला भारत देश आहे. 2023 च्या सुरुवातीलाच जागतिक तज्ञांनी भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असेल असे वर्तवले होते. आता युनायटेड नेशन्स पाॅप्युलेशन फड च्या सध्याच्या आकडेवारीने याची पुष्टी केली आहे. 

युनायटेड नेशन्स लोकसंख्या निधी फंड च्या आकडेवारीनुसार भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. सध्या भारताची लोकसंख्या ही तीन पेक्षा 20 लाख जास्त आहे आणि देशाची लोकसंख्या 142.87 कोटीच्या पुढे गेली आहे. तर चीन मधला जन्मदर यंदा चांगलाच कमी झाला असल्याने चीनची लोकसंख्या आटोक्यात येत आहे.

पहिल्यांदाच भारताची लोकसंख्या चीन पेक्षा जास्त 

युनायटेड नेशन्स लोकसंख्या निधी आकडेवारीत 1950 पासून भारताची लोकसंख्या चीन पेक्षा जास्त नोंदवली जाण्याची पहिलीच वेळ आहे. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर 1945 ला युनायटेड नेशन्स लोकसंख्या निधीची स्थापना झाली आणि त्यांनी स्थापना झाल्यानंतर 1950 पासून लोकसंख्येची आकडेवारी गोळा करायला सुरुवात केली. 2020 ते 2023 या कालावधीत युनायटेड नेशन्स लोकसंख्या निधी नोंदवलेला लोकसंख्येचा तक्ता पाहिला तर भारत देशाची लोकसंख्या अशाप्रकारे वाढली.

• 2020 मध्ये भारताची लोकसंख्या 139.67 कोटी  होती,       जी 2019 च्या तुलनेत 0.96% अधिक होती.

• 2021 मध्ये भारताची लोकसंख्या 140.70 कोटी होती,         जी 2020 च्या तुलनेत 0.8% अधिक होती.

• 2022 मध्ये भारताची लोकसंख्या 141.71 कोटी एवढी         होती, जी 2021 च्या तुलनेत  0.68% जास्त होती.

• 2023 मध्ये भारताची लोकसंख्या 142.86 कोटी आहे,         जी 2022 च्या तुलनेत  0.81% जास्त आहे.

अधिक माहितीसाठी whatsapp ग्रुपला जॉईन व्हा..!

 




Post a Comment

0 Comments