महाराष्ट्रात गारपिटचे संकेत जिल्ह्यात दहा दिवसात गारपीट होणार
ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डक यांचा पुन्हा नवीन हवामान अंदाज आला आहे. येथे दहा दिवस शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. 26 एप्रिल पासून ते तीन मे पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल याबरोबरच काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची देखील शक्यता वर्तवली आहे. शेतकऱ्यांनी फळबाग व पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी असे ज्येष्ठ हवामानातज्ञ पंजाबराव डक यांनी सांगितले आहे.
राज्यात 25 ते 30 एप्रिल गारपिट होणार
महाराष्ट्र राज्यातील एकंदरीत परिस्थिती पाहिली असता 24 एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांनी हळद कांदा काढून झाकून ठेवावा कारण राज्यात 24 एप्रिलला पावसाचे वातावरण तयार होणार असल्याचं पंजाबराव डख यांनी सांगितलं होतं. 25 एप्रिल पासून 29 एप्रिल पर्यंत महाराष्ट्रातील हवामानामध्ये बदल होणार असल्याचे देखील पंजाबराव म्हणाले. पावसाबरोबरच काही भागांमध्ये गारपीट होण्याची देखील शक्यता वर्तवली आहे.
शेतकऱ्यांसाठी तातडीची सूचना
ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी आज आपला हवामान अंदाज सांगितला आहे. महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात 25 एप्रिल पासून वातावरणामध्ये बदल दिसणार आहे. मराठवाड्यातील व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातील शेतकऱ्यांचे कांदा काढणे चालू आहे कांद्याबरोबरच हळद पीक देखील काढणी चालू आहे. शेतकऱ्यांनी 25 ते 30 तारखेपर्यंत हळद आणि कांदा झाकून ठेवावा गारपिटीमुळे कांदा आणि हळद पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते असं ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितला आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाला बरोबरच पाळीव प्राण्यांची देखील काळजी घ्यावी.
या राज्यातील शेतकऱ्यांनी देखील काळजी घ्यावी
महाराष्ट्र लगत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांनी देखील काळजी घ्यावी. आंध्र प्रदेश तेलंगणातील शेतकऱ्यांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यावा तेलंगणातील शेतकऱ्यांनी देखील गारपीटी पासून सावध राहावे. पुढच्या आठवड्यामध्ये तेलंगणा भागात देखील गारपीट होऊ शकते असं पंजाबराव यांनी सांगितल आहे.
कृषीपुत्र ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख हे नेहमीच शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी व शेतकऱ्यांना सावध करण्यासाठी आपला अंदाज सांगत असतात. बहुतेक वेळा पंजाबराव डक यांचा अंदाज खरा ठरतो. सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे आपल्या शेतीमालाची व पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी व ही माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांच्या ग्रुप वर नक्की पाठवावी.


0 Comments