Header Ads Widget

का वाढत आहे भारतातील लोकसंख्या ?

 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 125 कोटी एवढी होती. ही लोकसंख्या जगातील लोकसंख्येच्या एकूण 17.5 टक्के एवढी होती. 2011 साली आपला देश भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला चीन नंतर दुसरा देश होता. भारताची लोकसंख्या 2011साली च अमेरिका, जपान, इंडोनेशिया, ब्राझील, व पाकिस्तान या देशांच्या एकूण लोकसंख्या एवढी होती. 1941 साली 31.86 कोटी एवढी होती. नंतर 2011 साली ही लोकसंख्या वाढून 121 कोटी एवढी झाली. आणि सध्या तर लोकसंख्या एवढ्या जोराने वाढत आहे की भारत जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. लोकसंख्या काय असते व ती का वाढते किंवा लोकसंख्या वाढल्यानंतर काय परिणाम होतात आपण हेच आज जाणून घेणार आहोत.






भारतामध्ये होत असलेल्या जनसंख्या विस्फोटावर आळा घातला नाही तर 2030 पर्यंत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश भारत बनेल असा तज्ञांचा अंदाज होता. मात्र भारताची लोकसंख्या अतिशय वेगाने वाढवून 2023 मध्ये भारत जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे.



लोकसंख्या वाढ म्हणजे काय ?

कोणतेही देशातील शहर, तालुके, जिल्हे व खेडेगावात राहणाऱ्या लोकांच्या एकूण संख्येला देशाची लोकसंख्या असे म्हणतात. देशामध्ये गरजेपेक्षा जास्त लोकसंख्या वाढल्याने संपूर्ण जगाला याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.
कोणत्याही देशातील शहर आणि क्षेत्रातील लोकांच्या संख्येतली होणारी वाढ म्हणजे लोकसंख्येची वाढ.


लोकसंख्या वाढण्याचे कारण काय?

लोकसंख्या वाढ ही सोप्या शब्दात सांगणं म्हणजे जेव्हा मृत्यू दरामध्ये कमी येते व जन्मदर वाढतो तेव्हा मोठ्या प्रमाणात लोकसंख्येत वृद्धी होते. या स्थीती ला लोकसंख्या विस्फोट म्हणतात. 1951 ते 1961 या काळामध्ये भारतातील सरासरी वार्षिक जन्मदर 42 हजार 

१) जन्म-मृत्युदर :- आपल्या देशात मृत्युदरात घट झालेली आढळून येते. परंतु जन्मदर मात्र त्या मानाने घटलेली नाही. आपल्या देशाचा 1000 लोकांमध्ये जन्मदर 27.5 आहे व मृत्युदर 0.5 आहे. त्यामुळे लोकसंख्येत वाढ होते.

२) अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा :- समाजामध्ये काही अंधश्रद्धा असतात. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मेल्यावर पाणी पाजण्यास व अग्नी देण्यास इस्टेटीला वारस पाहिजे, मुलगाच पाहिजे, त्यामुळे मुलाची वाट पहात कुटुंबात माणसे वाढतात. मुलगी ही परक्याचे धन समजले जाते त्यामुळे मुलगा होईपर्यंत कुटुंब नियोजन केले जात नाही. काही वेळेस पहिल्या पत्नीला मुलीच झाल्या तर दुसरा विवाह केला जातो व त्या पत्नीकडूनही कुटुंब वाढविले जाते. त्यामुळे लोकसंख्येत वाढ होताना दिसून येते.

३) जन्म ही ईश्वरी देणगी आहे :- काही समाजामध्ये कुटुंब नियोजन करणे पाप मानले जाते. जन्म ही ईश्वरीय देणगी समजले जाते. या अंधश्रद्धेपोटी लोकसंख्या वाढ होताना आढळून येते.

४) वैद्यकीय सुविधांचा अभाव व अज्ञान :- वैद्यकीय सुविधा असून देखील त्या ग्रामीण भागामध्ये पोहोचत नाहीत. काही वेळेस कुटुंब नियोजनांच्या साधनांची माहिती असते. परंतू त्याची उपलब्धता नसल्यामुळे म्हणजेच या सुविधांचा अभाव असल्यामुळे तीचा वापर केला जात नाही. गैरसमजुती व अज्ञानामुळे माहिती देवून देखील त्याचा वापर केला जात नाही. या कारणांमुळे लोकसंख्येमध्ये वाढ होताना दिसून येते.

५) बालमृत्यू व अर्भक मृत्यूचे प्रमाण :- ग्रामीण भागांमध्ये बालमृत्यूचे व अर्भक मृत्यूचे प्रमाण जास्त असल्यामुळे अनेक मुलांना जन्म दिला जातो. त्यामुळेही लोकसंख्येमध्ये वाढ होते.

६) मुलीच्या लग्नाचे वय :- ग्रामीण भागामध्ये 15 ते 16 व्या वर्षीच मुलीचे लग्न करून दिले जाते. लग्न झाल्यावर लवकर मुले होतात. त्यावर नियंत्रण करण्याकरिता तिला कुटुंबनियोजनाबद्दलच्या साधनांचा व माहितीचा अभाव व अज्ञान असते. या वयामध्ये ती कोणत्याही गोष्टींचे निर्णय कुटुंबामध्ये घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे वयाच्या पस्तीसाव्या वर्षापर्यंत ती गर्भधारणा करू शकते. त्यामुळे अनेक अपत्य जन्माला येतात. हे देखील लोकसंख्या वाढीमध्ये भर घालणारे घटक आहेत.

७) निरक्षरता :- आपल्या देशात निरक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. निरक्षरतेमुळे अंधश्रद्धा वाढतात. अशी लोकसंख्या वाढली तर माणसाला अनेक अडचणींना तोंड दयावे लागते. शिवाय शासनालासुद्धा आरोग्य सुविधा व इतर सुविधा पुरविणे अवघड होते. तेव्हा ही लोकसंख्यावाढ थांबविण्यासाठी विविध स्तरावर अनेक प्रयत्न चालू आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील स्त्री पुरुषामध्ये जागृती निर्माण करणे गरजेचे आहे. लोकसंख्यावाढीमुळे अनेक अडचणी उभ्या राहतात. त्या संबंधीची जाणीव लोकांमध्ये निर्माण करायला हवी.

Post a Comment

0 Comments