राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पवारांना राजीनामा मागे घेण्याची वारंवार विनंती करण्यात येत आहे. पक्षाचे सर्वच नेते राजीनामा मागे घ्या म्हणून शरद पवार यांना आग्रह धरत आहेत. यावेळी कार्यकर्ते व नेत्यांना अश्रु अनावर झाले. दरम्यान, जयंत पाटीलही शरद पवार यांच्या बाजूलाच बसले. पण त्यांना लगेच रडू फुटले. त्यांना बोलता येईना.
त्यानंतर मनाचा हिय्या करून जयंत पाटील बोलू लागले. पुन्हा हुंदका दाटून आला. त्याच रडवेल्या आवाजात त्यांनी साहेब निर्णय मागे घ्या. तुम्हाला जी भाकरी फिरवायची ती फिरवा. मीही काही बोलणार नाही. आम्ही सर्व राजीनामे देतो. आमच्या सर्वांचे राजीनामे घ्या. पण तुम्ही पक्षाच्या अध्यक्षपदावरून जाऊ नका. अध्यक्षपदी कायम राहा, असा आग्रह धरत जयंत पाटील थांबले. अश्रू थांबत नव्हते.
त्यांच्या या घोषणेनंतर आता पवार हे पद कोणाच्या हाती देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. किंबहुना राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार यांच्याकडेही पाहिले जाते. त्याचवेळी शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या पवारांच्या उत्तराधिकारी मानल्या जातात. अशा स्थितीत पक्षाध्यक्षपदाची लढाई आगामी काळात रंजक ठरू शकते.
याआधी गेल्या आठवड्यात पवारांनी मुंबईत आयोजित युवा मंथन कार्यक्रमात याबाबत बोलले होते. पवार म्हणाले, ”मला कोणीतरी सांगितले की, भाकरी योग्य वेळी परतावी लागते आणि ती योग्य वेळी परतली नाही तर ती कडू होते. आता भाकरी परतण्याची योग्य वेळ आली आहे, त्यात उशीर होता कामा नये. या संदर्भात मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना यावर काम करण्याची विनंती करणार आहे.”
शरद पवार यांच्या या निर्णयानंतर उपस्थित असलेले कार्यकर्ते व नेतेमंडळी यांनी घोषणाबाजी केली. तसेच अनेक नेतेमंडळींनी व कार्यकर्त्यांनी त्यांना निर्णय मागे घेण्यासाठी सांगितलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही शरद पवार यांना निर्णय मागे घेण्यासाठी सांगितलं. एकीकडे सर्वजण शरद पवारांच्या या भूमिकेला विरोध करत असताना मात्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान अजित पवारांची ही भूमिका कार्यकर्त्यांना विशेषत शरद पवार समर्थकांना आवडली नाही अजित पवार यांच्या भूमिकेवरही राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अजित पवारांच्या या भूमिकेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत सांगितलं की "अजित पवार खूप उतावीळ दिसत आहेत"शरद पवार यांचा राजीनामा स्वीकारला जाईल याची ते खात्री करत आहेत.
अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन व्हा



0 Comments