छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजे सारथी संस्थेच्या वतीने मराठा समाजातील मुला- मुलींना मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
हे शिक्षण ज्या ठिकाणी संगणक प्रशिक्षण देण्यात येते आहे व कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत ही योजना आखण्यात आली आहे, यातून मराठा व कुणबी समाजातील 18 ते 45 कमीत कमी 10वी उत्तीर्ण उमेदवारांना हे व्यक्तिमत्व व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
अनेकदा संगणक प्रशिक्षणासाठी मुला-मुलींना आथिर्कदृष्ट्या अडचणी निर्माण होतात, त्यामुळे ही योजना अनेक मराठा व कुणबी समाजातील मुला-मुलींसाठी लाभदायक ठरणार आहे.
➡️लेक लाडकी योजना 2023 संपूर्ण माहिती⬅️
मराठा समाजातील मुला-मुलींना आरक्षण नसल्यामुळे शासनाच्या कुठल्याही कोर्सला सवलती मध्ये प्रवेश मिळत नाही, परंतु सारथी संस्थेच्या माध्यमातून अशा प्रकारचे मोफत कोर्स तसेच इतर शैक्षणिक सवलत सारथी संस्थेमार्फत मराठा समाजातील मुला-मुलींना मिळत आहे. म्हणून मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी सारथी संस्थेमार्फत जे काही कोर्स आणि इतर शैक्षणिक सवलतीचा लाभ घ्यावा.


0 Comments